Responsive image

डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय, कुंडल


70x70

मा.महेंद्र (आप्पा) सुबराव लाड

(संस्थापक-अध्यक्ष)


          सामान्य कुटुंबातील सर्व मुलांना अत्याधुनिक पद्धतीने, दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सन २००३-०४ साली पार्वती लाड एज्यूकेशन सोसायटी कुंडलची स्थापना केली आहे. या संस्थेच्यामध्ये डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेज कुंडल, डॉ. पतंगराव कदम बालविकास मंदिर व डॉ. पतंगराव कदम प्राथमिक शाळा कुंडल, तसेच क्रांतीसिंह नाना पाटील इंग्लिश मिडियम स्कूल या शाखा कार्यरत आहेत. तसेच पलूस येथे हिराई पब्लिक स्कूल ही दर्जेदार शिक्षण देणारी शाखा सुरु आहे. या शाळांमधून गुणवंत विद्यार्थ्यांना आणि होतकरु विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. गरीब कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते.

          या शाळांमधून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमधून यश मिळविले आहे. आज ते मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षण देणे यावर मा. महेंद्र आप्पा नेहमीच भर देतात त्याचबरोबर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेने त्यांना सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

          ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याची संधी देण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देणे आणि भांडवल उभे करुन देण्यासाठी सन २०२१-२२ या सालात ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर AC & ABC सेंटर कुंडल येथे सुरु केले आहे. यामधून प्रशिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना उद्योगासाठी २० लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते. यावर ३६% ते ४४% पर्यंत सबसिडी मिळते. नुकतेच डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पुण्यतिथी दिवशी या प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाचे सर्व शेती अधिकारी उपस्थित होते.

          अशा रीतीने पार्वती लाड एज्यूकेशन सोसायटी या संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे. या शाळांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शाळा सिद्धी मध्ये 'अ' मानांकन प्राप्त झालेले आहे.