Responsive image


बाह्य परीक्षांचे मार्गदर्शन/शिक्षण



      आजच्या धावत्या युगात स्पर्धा खूपच वाढलेली आहे. त्यासाठी मुलांची पूर्व तयारी असणे फार गरजेचे आहे. आज NMMS, माध्यमिक शिष्यवृत्ती, नवोदय, CET यांसारख्या बाह्य परीक्षा घेतल्या जातात. तसेच भारती विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या गणित व इंग्लिश या विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये मुलांनी सक्रीय सहभाग घेऊन चांगले गुण मिळवून आपली चमक दाखवण्यासाठी शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत असतात. दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थी नाविन्यपूर्ण यश प्राप्त करतात. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन तसेच आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थी देखिल त्याचा लाभ घेऊन चांगले गुण प्राप्त करून विद्यालायचे नाव उज्ज्वल करत आहेत.