Responsive image


भौतिक सुविधा आणि इतर सोयी सुविधा



विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्चशिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग आहे. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन दिले जाते. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उत्तम प्रतीचे आणि आधुनिक पद्धतीचे बेंच उपलब्ध आहेत.सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम असे दोन वर्ग उपलब्ध आहेत.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कॉम्प्युटर लॅब आहे. इंटरनेट ची सुविधा उपलब्ध आहे. लॅबमध्ये 25 अत्याधुनिक व नवीन संगणक आहेत. दररोज प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती व त्यांना हाताळण्यास दिले जातात . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे.

विद्यालयामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम वारंवार होत असतात. जसे कि महापुरुष, लढा देणारे स्वातंत्र्यसैनिक यांच्या जयंती-पुण्यतिथी त्याचबरोबर छोटे-मोठे कार्यक्रम/सोहळे या सभागृहामध्ये घेतले जातात. या सभागृहाला 'मातोश्री हिराबाई लाड' हे नाव दिलेले आहे. सभागृहात एकाचवेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी बसू शकतात एवढी क्षमता आहे.

विद्यालयातील काही विद्यार्थी लांबून येतात, त्यांच्यासाठी प्रवासाचा प्रश्न अवघड होऊ नये यासाठी विद्यालयात स्कूल बसची सोय केलेली आहे. विद्यालयामध्ये १० स्कुल बस उपलब्ध आहेत. उत्तम वाहन चालकांची नेमणूक आम्ही प्रत्येक गाडीवर केलेली आहे. त्याचबरोबर शिक्षक सुद्धा सगळे विद्यार्थी स्कूलबस मध्ये बसवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पार पडतात. त्यामुळे पालक देखिल पूर्ण विश्वासाने मुलांना गाडी मधून पाठवून देतात.

विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळण्यासाठी भव्य असे मैदान आहे. या मैदानावरती विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याच बरोबर खेळांचा सराव करून घेतला जातो. विद्यालयातील बरेच विद्यार्थी कब्बडी, तलवारबाजी, कुस्ती, क्रिकेट, तायक्वांदो अशा खेळांत राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धात उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोरंजन व प्रत्येक इयत्तेसाठी सर्व विषयांच्या मार्गदर्शनासाठी 'नवनीत' या नामवंत कंपनीचे 'Top scorrer' हे सॉफ्टवेअर इंस्टॉल करून घेतले आहे. त्याचा लाभ सर्व विद्यार्थी घेतात. त्याचबरोबर मुलांचा विरंगुळा होण्यासाठी त्यांना शौर्याचे, देवा-धर्माचे व ऐतिहासिक तसेच लहान मुलांचे चित्रपट देखिल दाखवले जातात. मुले देखिल त्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात उतरवून अभ्यासात अवलंब करतात.

विद्यालयामध्ये chemistry, biology, physics ची भव्य लॅब सुद्धा उपलब्ध आहे. मुलांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यासाठी लॅबमध्ये विविध प्रयोग करून दाखवले जातात. जेणेकरून मुलांना ते योग्य समजेल. कारण प्रात्यक्षिक केल्यामुळे समजण्यास सोपे जाते आणि लक्षात येते.

शांत व निसर्गरम्य वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची सोय केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आवांतर वाचन वाढावे व बाहेरील जगाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी सुसज्ज असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयात सुमारे ४५०० पुस्तके आहेत. याचा विद्यार्थी लाभ घेतात.

विद्यालयामध्ये मुलांना पोषक आहार दिला जातो. तो आहार तयार करण्यासाठी आचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये योग्य तो आहार बनवून मुलांसाठी दिला जातो. यामध्ये स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. व सकस आहार बनवला जातो. तो आहार खाण्याकरिता भोजन कक्ष सुद्धा आहे जिथ बसून जेवण करता येईल.

विद्यालयामध्ये मुलांना पोषक आहार दिला जातो. तो आहार तयार करण्यासाठी आचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये योग्य तो आहार बनवून मुलांसाठी दिला जातो. यामध्ये स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. व सकस आहार बनवला जातो.

विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मुलांना फिल्टर केलेले स्वच्छ पाणी दिले जाते तसेच हात धुण्याकरिता दुसरी चावी व handwash सुद्धा ठेवला आहे. स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते.