Responsive image



डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय, कुंडल


          पार्वती लाड एज्युकेशन सोसायटी, कुंडल संचलित डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालयाची स्थापना सन २००३ मध्ये झाली.

          संस्थेचे संस्थापक मा. महेंद्र (आप्पा )सुबराव लाड अध्यक्ष समन्वय समिती तालुका पलूस, जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड सांगली, यांनी परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी मा. आप्पांनी एका छोट्याशा वाड्यामध्ये या शाळेची सुरुवात केली.

          विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून शाळेत प्रवेश न देता प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्याला प्रवेश देऊन गुणवत्ता निर्माण करणे हा उद्देश ठेवून वाटचाल केली आणि यामुळेच आज एका लहानश्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. या वटवृक्षाच्या सावलीत शेकडो विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल केले आहे व करत आहेत.