कु. बाबर के. टी. (M.Sc.,B. Ed.)
मुख्याध्यापिका
    सन 2003 साली पार्वती लाड एज्युकेशन सोसायटी, कुंडल ची स्थापना झाली संस्थेच्या स्थापनेबरोबरच डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय, कुंडल ची सुरुवात झाली.
    विद्यालय सुरु करताना बरीच आव्हाने समोर होती. अशा आव्हानांना स्वीकारून कु. बाबर के. टी. यांनी विद्यालयाचा मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला. गावातील एका वाड्यामध्ये विद्यालयाची सुरुवात झाली होती. अशा वाड्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
    गावातील तसेच गावाच्या आसपास असणाऱ्या वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थी व पालक भेट घेऊन त्यांना शाळेच्या वैशिष्ठ्यांची माहिती करून दिली.
    तसेच संस्थेकडे पाठपुरावा करून विद्यालयासाठी इमारत व भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवोपक्रम राबवून विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.
    पलूस तालुक्यातील शाळा सिद्धी "अ" मानांकन प्राप्त शाळा तसेच पलूस तालुक्यातील पहिली ISO मानांकन प्राप्त शाळा करण्याचे, त्याच बरोबर पलूस तालुक्यातील पहिली 'डिजीटल क्लासरूम' बनवण्याचे महत्वपूर्ण काम केले.
    इयत्ता १०वी १२वी तील विद्यार्थ्यांसाठी करियर बद्दल मार्गदर्शन, गेस्ट लेक्चर, संस्कार वर्ग, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन, समुपदेशनपर व्याख्याने, उद्बोधन वर्ग, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले. परिसरातील तसेच बाहेरील शाळांना भेटी देऊन तेथील नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यालयात राबवले.
    विविध स्पर्धा परीक्षेसाठी जादा वर्ग उपलब्ध करून CET, NEET, JEE यासारख्या प्रवेशपरीक्षेसाठी विविध मार्गदर्शन वर्ग भरवले.
    विद्यार्थ्यांना शालेय शिस्ती सोबतच गणवेश पासून ओळखपत्रापर्यंत अनेक बारकावे त्यांनी शालेय कामकाजामध्ये आणले. शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवत्ता यांचा चांगला समतोल राखला.
    भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा व संगणकीय क्षेत्रात सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अद्ययावत संगणक कक्ष उपलब्ध करून दिला त्याचा लाभ अनेक विध्यार्थ्यांना झाला आहे आणि होत आहे.
    गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण या योजनेतून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण विनामूल्य देण्यात आले आहे. या सर्व कामाची दखल घेऊन पंचायत समिती पलूस यांचे तर्फे सन २०१६-१७ चा 'आदर्श शिक्षिका 'पुरस्काराने सन्मानित करणेत आले तसेच सन २०२०-२१ या वर्षी रोटरॅक्ट क्लब तर्फे 'हिरकणी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.