Responsive image



डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय, कुंडल


          पार्वती लाड एज्युकेशन सोसायटी, कुंडल संचलित डॉ. पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेजमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यासाठी मोठा सभागृह आहे. प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो.

          विद्यालयामध्ये शिवजयंती, गणेशोत्सव, देशातील होऊन गेलेल्या नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी, स्मृतिदिन साजरे केले जातात. यासाठी विद्यार्थी वेशभूषा परिधान करतात त्याचबरोबर विद्यार्थी त्या-त्या दिवशी भाषण करतात त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती सांगतात. त्याचबरोबर रोज परिपाठ सुद्धा सादर केला जातो.

          गणेशोत्सव असला कि बाप्पाचे आगमन एकदम थाटात केले जाते रोज श्रींची आरती करून प्रसाद वाटला जातो. नवीन गोष्ठ म्हणजे ज्या ठिकाणी मदतीची गरज असते जसे कि पूर परिस्थिती, दुष्काळ परिस्थिती अश्या वेळी त्या ठिकाणांना चारा वाटप केला जातो, स्वच्छतेसाठी आवश्यक मदत केली जाते.