Responsive image



नियम व अटी


कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येकाजवळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना शाळेने ठरवून दिलेला गणवेश सक्तीचा आहे.

कनिष्ठ महाविद्यालय परिसरात अथवा विद्यालयात मोबाईलचा वापर करता येणार नाही.

कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्येक तास व प्रॅक्टीकलला नियमित व वेळेवर हजर राहणे बंधनकारक राहील.

कनिष्ठ महाविद्यालयात वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा देणे बंधनकारक राहील अन्यथा दंडात्मक कारवाई होईल.

कनिष्ठ महाविद्यालयात वर्षात एकूण होणाऱ्या तासापैकी ८०% तासास हजर राहणे आवश्यक आहे. ८०% हजेरी नसेल तर परीक्षेचा फॉर्म भरला जाणार नाही.

या कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस परवानगी शिवाय कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात व इमारतीत प्रवेश करता येणार नाही.

ग्रंथालयातील पुस्तके ठरवून दिलेल्या वेळी परत करावीत. पुस्तके गहाळ झाल्यास पुस्तकांची दुप्पट किंमत भरावी लागेल.

सूचना फलकावरील सूचनांची विद्यार्थ्यांनी वेळीच दखल घ्यावी. न वाचल्यामुळे होणाऱ्या नुकसानीस कनिष्ठ महाविद्यालय जबाबदार राहणार नाही.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात प्राध्यापक व कर्मचारी यांच्याशी सौजन्याने वागावे.

विद्यार्थ्यांचे वर्तन नैतिकतेस बाधा आणणारे असल्यास त्याचा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश तात्काळ रद्द केला जाईल.

कोणत्याही कारणाने विद्यार्थ्याचे नाव कमी करावयाचे असेल तर पालकांनी तसे लेखी कळवावे अन्यथा विद्यार्थ्याला फी भरावी लागेल.

पालकांनी / विद्यार्थ्यांनी लेखी मागणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा दाखला / बोनाफाईड दिले जाणार नाही.